Gutkha Seized : बदनापूर हद्दीत १२ लाख ६६ हजारांचा गुटखा पकडला file photo
जालना

Gutkha Seized : बदनापूर हद्दीत १२ लाख ६६ हजारांचा गुटखा पकडला

पोलिसांची भल्या पाहटे कारवाई, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gutkha worth Rs 12.66 lakh seized in Badnapur area

बदनापुर, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील बदनापूर हद्दीत मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने रविवार (२४) रोजी पहाटे छापा टाकला.

यावेळी जावेद गुलाब मिर्झा बेग (वरा. शेकटा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हा अशोक लेलँड वाहन (क्रमांक -२० २१९४) मधून बाजार गेवराई मार्गे बदनापूरकडे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला घेऊन येत होता. पोलिसांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेत तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.

या कारवाईत पथकाने राजनिवास पान मसाला, गोवा-१०००, वी-१ विंग तंबाखू, विमल पान मसाला तसेच के. एन. ०१ जाफरानी जर्दा असा एकूण १२ लाख ६६ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचाही समावेश आहे.

या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

पोलिस अलर्ट मोडवर

जालना जिल्ह्यात नुतन पोलिस अधिक्षक तेघबीरसिंह संधु यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलिसांची अवैध धंद्या विरोधात कारवाईत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अवैध धंद्यावरील कारवाईमुळे नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT