डंके की चोट पे कहो हम 'एसटी' है : ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांची धनगर समाजबांधवांच्या उपोषणस्थळी भेट  File Photo
जालना

डंके की चोट पे कहो हम 'एसटी' है : ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांची धनगर समाजबांधवांच्या उपोषणस्थळी भेट

अंबड चौफुली स्थित अहिल्यादेवींच्या नियोजित स्मारकस्थळी दिपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने जर्नल सी जजमेंट दिले आहे. यात पाच न्यायालयाच्या पीठाने न्यायाधीश नरीमन यांचा समावेश होता. या जममेंटच्या शेवटच्या परिच्छेदात अनुसूचित जमातींचे मागासलेपण तपासण्याची गरजच नाही. असे म्हटले. म्हणून डंके की चोट पे धनगर एसटी है, असे वक्तव्य अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी येथे केले.

अंबड चौफुली स्थित अहिल्यादेवींच्या नियोजित स्मारकस्थळी दिपक बोऱ्हाडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. रविवार दि.२१ हा आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. या उपोषणाला सदावर्ते कुटुंबियांनी भेट दिली. यावेळी अॅड. सदावर्ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, की मी तोलून मोलून बोलतो. मला न्यायालयात बाजू मांडायची असते. म्हणून धनगर बांधवांनी कायदेशीर तीन मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. पहिला मुद्दा म्हणजे आम्ही धनगड आहोत. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही क्रिमिनल ट्राईब आहोत. म्हणजेच, इंग्रजांच्या काळात १८ व्या शतकात आदिवासी जमातींना क्रिमिनल म्हणून संबोधले जायचे. शेड्यूल ट्राईब म्हटल्या जायचे. म्हणून धनगर एसटी आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुप्रिम कोर्टाने जर्नल सी जजमेंट दिले आहे. पाच न्यायाधीश होते. न्यायाधी नरीमन यांचाही समावेश होता. या जजमेंट मध्ये शेवटच्या परिच्छेदात अनुसूचित जमातींचे मागासलेपण तपासण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच आपण एसटी आहोत.

दरम्यान, अॅड. सदावर्ते यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या साम्राज्यातील जनतेला पिण्याची पाणी पिता यावे यासाठी ठिकठिकाणी बारवांचे निर्माण केले. त्यांच्या विचारांची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसुल मंत्री बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, मंत्री गिरीश महाजन आमच्या बोराडे यांचा पाच दिवसांचा उपवास सोडवायला या. येताना जीआर नव्हे, तर अॅक्ट घेऊन या, असे ते म्हणाले. तुम्हाला कायदेशीर रित्या एसटी आरक्षण देऊ. कायदा कुणीही हातात घेऊ नका, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

सरकार आले नाही.. तू तरी मला घेवून चल...

चार दिवस झाले सरकार उपोषणाला भेट द्यायला आले नाही. तू मला तरी घेऊन चल असे म्हणून माझी ८० वर्षांची आई आज दीपक बोराडे यांना भेटण्यासाठी आली. मी संविधानाची भाषा बोलतो म्हणुन सरकार देखील माझे एकते. तुमचे आणि माझे नाते रक्ताचे आहे.

मला माहिती आहे, माझा धंदा रेतीचा नाही मी टिप्परवाला नाही, मी चपटी पीत नाही. ज्या दिवशी सरकार धनगर बांधवांना एसटीचे जात प्रमाणपत्र देइल त्यादिवशी मी स्वतः येईल.

धनगर समाजाचा बुधवारी जालन्यात राज्यव्यापी इशारा मोर्चा : दीपक बोऱ्हाडे

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिपक बो-हाडे यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणास अन्य समाजासह राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. पाचव्या दिवशी त्यांनी सोमवार दि. २२ रोजी राज्यातील प्रत्येक तहसिल मध्ये आरक्षणा संदर्भात निवेदन देण्याचे आवाहन केले. जो पर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तो पर्यंत आपण आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बुधवारी दि. २४ रोजी जालन्यात राज्यव्यापी इशारा मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात लाखों समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT