Guardian Minister Munde inspects the damage: Visits to Viregaon Tanda, Bhendala, M. Chincholi villages
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आमदार हिकमत उढाण यांच्यासह घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विरेगाव तांडा, भेंडाळा, म. चिंचोली, मोहपुरी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाहणी दरम्यान कापूस, तूर, मूग, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांसोबतच फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले. तसेच अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने सामान्य शेतकरी कुटुंबांचे संसार उद्धस्त झाल्याचेही चित्र दिसून आले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पिके उध्वस्त झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्येही पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पानेवाडी, घनसावंगी, रांजणी तसेच राणी-उंचेगाव या मंडळांचा यात समावेश न झाल्याची तक्रार करण्यात आली.
भरपाई मिळून देणार घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू दिले जाणार नाही. सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल.- आ. हिकमत उढाण