Gondi police arrest gang preparing for robbery
शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात उसाच्या शेतातून दरोड्याच्या तयारी असलेल्या टोळीला गोंदी पोलिसांनी जेरबंद केले. पकडण्यात आलेले संशयित आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील आहेत.
अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे पथक राष्ट्रीय महामार्गावर कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना त्यांना बारसवाडा फाटा रोडवर मध्यभागी एक एअर जॉक ठेवलेला व जवळच उसाच्या शेतालगत काही इसम दबा धरून बसलेले निदर्शनास आले. यावेळी पोलिस पथकानी संशयितांचा पाठलाग करून वडीगोद्री येथील हॉटेल स्वामिनीच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतात तीन संशयितांना पकडले.
संशयितांची नावे आबा चंदर पवार, काशीनाथ संजय पवार, विकास रामा शिंदे व ( रा. शिवशक्ती नगर तांदुळवाडी रोड वाशी ता. वाशी जि, धारशिव) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाई दरम्यान पळून गेलेल्या तीन संशयितांची नांवे कैलास रामा पवार, प्रभाकर ऊर्फ सिकंदर राम पवार, अविनाश आबा पवार (रा. शिवशक्ती नगर तांदूळवाडी रोड वाशी, ता. वाशी, जि. धारशिव) असे असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयितांच्या घेतलेल्या अंग झडतीत आबा पवार यांच्या जवळ एक इनोव्हा वाहनाची चावी मिळून आली. सदर वाहन मुख्य हायवे लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर उभे केल्याचे संशयिताने सांगितले.
पोलिसांनी वाहनातून एक दोन लॉखडी एअर जॅक, लॉखडी रॉड, एक दोर, लोखंडी पाईप, कोयता, वा एक मिरची पूड असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. संशयितांच्या ताब्यातून ८ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात पोलिस उपा निरीक्षक संतोष मुपडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि जंगले हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबडचे उपविभागीय पोलिस अधीकारी सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशीष खांडेकर, पोउपनि मुपडे, हवलदार हजारे, हवालदार केंद्रे, पोलिस कर्मचारी भोजने, सिद्दीकी, काळे, शेख व चालक वैद्य यांनी केली.