Gawati Pistol seized from youth's possession
जालना, पुढारी वृत्तसेवा युवकाच्या ताब्यातून तीन जीवंत काडतुसासह गावठी पिस्टतल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जालना तालुका पोलिसांनी रविवार दि. २३ रोजी मध्यरात्री पावने एक वाजेच्या सुमारास जालना अंबड रोडवरील अंतरवाला येथे केली.
या संदर्भात अंतरवाला गावाजवळ चारचाकी (क्र. एमएच ०२, सीव्ही ६७७४) मधील काही युवकात आपसांत भांडण सुरू होते. यातील एका व्यक्ती जवळ गावठी कट्टा असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन तालुका जालना पोलिस ठाण्याच्या पथकाने
त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आपसांत भांडण करणाऱ्यांना शांत केले. झाडाझडीत पवन प्रसाद पालवे (२०, रा. सेलू, जि. परभणी) याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला. त्यासोबत तीन जीवंत काडतुसेही आढळून आले आहेत.
गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे आणि ५ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन, असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार वसंत धस यांच्या फिर्यादीवरून आर- ोपीविरुद्ध भारतीय हत्यारबंदी कलमान्वये तालुका जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.