Gates installed on wakadi kolhapur bandhara
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन
तालुक्यातील वाकडी येथील जुई नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात झाडे व काट्याकुपाट्यात आडकले असून या बंधाऱ्याला दरवाजे बसविण्यात न आल्याने बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. या संबंधीचे वृत्त दैनिक पुढारीने २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करताच या कोल्हापुरी बंधाऱ्यावर दरवाजे बसविले. कोल्हापुरी पाट बंधारे व सिंचन विभाग अजून झोपेतच आहे.
वाकडी येथील कोल्हापुरी बंधारा असूनही दरवाजे नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ठेवले जात नाही, ज्यामुळे शेतजमिनीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. शेतीला पाणी मिळावे यातून दुबार-तिबार पिके घेता यावी, त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे, त्याचे जीवनमान उंचवावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
मात्र, येथील कोल्हापुरी बंधारे बांधून गेल्या काही वर्षापासून या बंधाऱ्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून याकडे एकही अधिकारी किंवा कर्मचारी आजपर्यंत या बंधाऱ्याच्या पहाणी करता आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
कालावधी उलटला तरी कोल्हापुरी दरवाजे गायब असल्याने त्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाहून जात होते, परंतू या बंधाऱ्यावर दरव-ाजे बसविण्यात आल्याने नदी परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना याचा फायदा होणार असून शेतीसाठी पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहेत.
या कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे बसविल्याने लाखो लिटर पाणी साठा उपलब्ध झाला असून या परिसरातील शेकडो हेक्टरवरील विहिरी आणि पाण्याचे स्त्रोत खाली आले आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठा फायदा झाले आहे.