Online Permission : गणेश मंडळांना आता ऑनलाइन परवानगी file photo
जालना

Online Permission : गणेश मंडळांना आता ऑनलाइन परवानगी

जालना पोलिसांची सिटीझन पोर्टलची नोंदणीसाठी सुविधा

पुढारी वृत्तसेवा

Ganesha mandals now allowed online

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना पोलिसांकडून सार्वजनीक गणेश मंडळांना नोंदणीसाठी 'सिटीझन पोर्टल'वर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पोलीस दलाने सार्वजनिक गणेश मंडळासाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेऊन ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

यंदा १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळाची पोलीस विभागाकडे नोंदणी आवश्यक आहे.

पोलीस अधीक्षक तेघवीर सिंह संधु यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक गणेश मंडळांच्या नोंदणीसाठी 'आपले सरकार'च्या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अथवा अर्जदार संकेतस्थळावर जाऊन प्रथम नागरिक म्हणून वैयक्तिक माहिती भरून यूजर आयडी तयार करावा. त्यानंतर या यूजर आयडीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचा अर्ज पूर्ण भरून ऑनलाइन सादर करावा. अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर त्याबाबतची माहिती अर्जदाराला मिळेल.

संपर्क करा

ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास अर्जदारांनी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपाली राखे यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सवाच्या नियोजनासाठी वेळेत ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक परवानगी घेण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT