जालना : ऑनलाईन फसवणूकीतील चाळीस हजार मिळाले परत  pudhari photo
जालना

जालना : ऑनलाईन फसवणूकीतील चाळीस हजार मिळाले परत

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दगडवाडी येथील एका व्यक्तीची ५६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्यापैकी ४० हजार रुपये भोकरदन पोलिसांनी त्याला परत मिळवून दिले आहेत.

भोकरदन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दगडवाडी येथील दिपक त्र्यंबक हिरे यानी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांना ते वापरत असलेले एसबीआय व एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून देतो म्हणून फसवणुकीचा कॉल आला होता. कॉल करणाऱ्या भामट्याने सांगितले की तो बँकेतून बोलत आहे. तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा फार कमी आहे, मी तुम्हाला क्रेडिट कार्डची मर्यादा दुप्पट करून देतो असे म्हणून फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून ५६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती.

त्यानतर पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंदे, पोलिस कर्मचारी सोमनाथ मंडलिक, सायबर पोलिस ठाण्यात सदर फिर्यादींना मार्गदर्शन वारुन त्यांची केंद्र सरकारच्या हेल्पलाईन १९३० वर सदरची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर २४ तासांत फिर्यादीचे ४० हजार रुपये त्यांच्या खात्यावर परत आले.

तक्रार करा

नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीच्या फोन कॉलला बळी पडू नये. आशा प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तत्काळ केंद्र सरकारच्या हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवावी, असे अवाहन भोकरदनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT