जालना

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sureshkumar Jethaliya passes away | त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

परतूर : मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे शुक्रवारी (दि.1) पहाटे ५ वाजताच्या सुमारास परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सुरेशकुमार जेथलिया हे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात भर दिला. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत अनेक विकासकामे मार्गी लावली.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणारे नेतृत्व म्हणून सुरेशकुमार जेथलिया यांची वेगळी ओळख होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मजबूत पकड होती. 15 मे 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या परतूर नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अत्यंत काट्याच्या लढतीत नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले असले, तरी त्यांच्या निवडणूक नियोजनशैलीची सर्वत्र चर्चा झाली होती. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

वयाच्या 69 व्या वर्षीही तुम्ही एका खऱ्या पुरुषासारखे अनुभवू सुरेशकुमार जेथलिया यांच्या अचानक झालेल्या निधनाने परतूर-मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, समर्थक आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना गुरुवारी रात्रीच छातीत दुखतं असल्याने त्यानी डॉक्टरांना दाखवून गोळ्या औषधं घेतल्या होत्या. गोळ्या घेऊन रात्री झोपले. सकाळी पाच वाजता त्यांना त्याच्या पत्नीने उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. पत्नी विमलताई जेथलिया यांनी कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. डॉक्टरांना घरी पाचरण करण्यात आले. डॉक्टराणी तपासणी केली. शरीर प्रतिसाद देत नसल्याने जेथलिया यांना पहाटे पाच वाजता जालना येथे खाजगी दवाखाण्यात हलविले डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. त्याच्या पश्चाता पत्नी विमलताई जेथलिया, नितीन जेथलिया, प्रवीण जेथलिया हे दोन मुले, सूना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. यांच्यावर परतूर येथील त्याच्या जिंनिंग फॅक्टरी परिसरात शनिवार (२ मे) सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT