Inflation : वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे दिवाळीच्या आनंदावर विरजण file photo
जालना

Inflation : वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे दिवाळीच्या आनंदावर विरजण

सणासुदीच्या खरेदीवर आर्थिक मर्यादा, कसा गोड लागणार दिवाळीचा फराळ

पुढारी वृत्तसेवा

Financial limits on festive shopping, how sweet will Diwali snacks be?

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी म्हटली की घराघरांत उत्साह, आनंद, रोषणाई आणि फराळाची लगबग सुरू होते. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे दिसत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमर्तीमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवताना नागरिकांची दमछाक होत असून, डाळी आणि किराणा साहित्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे महागाईमुळे डाळ शिजेना, तर दिवाळीचा फराळ गोड कसा लागणार? असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे यांसह विविध पदार्थ बनविण्याची तयारी केली जाते. मात्र, फराळ तयार करण्यासाठी लागणारे बेसन, डाळी, तेल, तूप, साखर, रवा, मैदा आणि इतर साहित्य खरेदी करताना नागरिकांना खर्चाचा विचार करावा लागत आहे. रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खर्चातच वाढ होत असल्याने सणासाठी वेगळी तरतूद करणे अनेक कुटुंबांना कठीण जात आहे. रोजच्या खर्चातून बचत करायची तरी कशी?

महागाईचा परिणाम केवळ दिवाळीच्या खरेदीवरच नव्हे, तर दैनंदिन जीवनावरही होत आहे. घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, प्रवास आणि किराणा यांसारख्या खर्चामुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट आधीच ताणले गेले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसाठी नवीन कपडे, घराची सजावट, पूजासाहित्य आणि फराळाचे साहित्य खरेदी करताना अनेकांना हात आखडता घ्यावा लागत आहे.

दिवाळी हा आनंदाचा आणि एकमेकांमध्ये गोडवा वाटण्याचा स आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच किमती सर्वसामान्यांच्या आवाक्य राहिल्या नाहीत, तर सण साजा करणेही आर्थिक आव्हान ठरते. त्यामु बाजारातील किमतींवर नियंत्र ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी ल द्यावे आणि सर्वसामान्यांना दिलान मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडू व्यक्त होत आहे.

एकीकडे दिवाळीचा उत्साह, व दुसरीकडे महागाईचे सावट! अभ परिस्थितीत यंदाच्या दिवाळीत गोडध पदार्थांचा आनंद घेताना सर्वसामान्यांना खर्चाचा हिशेब मांडान लागत आहे. त्यामुळे महागाईच् झळांमध्ये दिवाळीचा फराळ किती ग लागणार, हा प्रश्न कायम आहे.

फराळाच्या प्रमाणात कपात करण्याची वेळ

पूर्वी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच घराघरांत फराळ बनविण्याची लगबग सुरू व्हायची. नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांना फराळ देण्याची परंपराही जपली जायची. मात्र, वाढत्या खर्चामुळे यंदा फराळाचे पदार्थ कमी प्रमाणात बनविणे किंवा बाजारातून तयार फराळ खरेदी करण्याऐवजी घरच्या घरी मोजके पदार्थ तयार करण्याचा पर्याय अनेक कुटुंबांना स्वीकारावा लागू शकतो. सणाचा आनंद कायम ठेवण्याची इच्छा असली, तरी वाढत्या खर्चामुळे खर्चाला मर्यादा घालण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT