घरगुती गॅस टंचाईची धास्ती, गॅस मिळवण्यासाठी आटापिटा file photo
जालना

Domestic Gas घरगुती गॅस टंचाईची धास्ती, गॅस मिळवण्यासाठी आटापिटा

मध्य आशियात सुरू असलेल्या अमेरिका इस्त्रायल आणि इराणच्या युध्दाचा विपरित परिणात जालना जिल्ह्यासह भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे देखील पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Fear of domestic gas shortage, struggle to get gas

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : मध्य आशियात सुरू असलेल्या अमेरिका इस्त्रायल आणि इराणच्या युध्दाचा विपरित परिणात जालना जिल्ह्यासह भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे देखील पाहायला मिळत आहे. सध्या गावात घरगुती गॅस टंचाईच्या भितीने ग्राहकांनी उन्हातान्हात उभे गॅस मिळविण्यासाठी जिवाचा आटापीटा चालविला आहे.

दरम्यान, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गॅसची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. गॅस संपल्यामुळे बहुतांश गृहिणींना ऑनने घरगुती गॅस सिलेंडर घ्यावे लागले. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या घरगुती गॅसची वेटींगही वाढवली असल्यामुळे गॅस भरण्यासाठी मोठ्या अडचणीला पिंपळगाव रेणुकाई गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या पुरवठा कमी होत असल्याने घरगुती गॅसची सिलेंडरची गाडी आल्यानंतर या गाडीच्या पाठीमागे रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद

पिंपळगाव रेणुकाई गावात छोट्यामोठ्या हॉटेल्स, अल्पोपहारगृह मोठ्या प्रमाणात आहे. छोटे व्यावसायिक हातगाड्यावर आपले अल्पोपहारगृह चालवतात. मात्र, व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय, व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅसचा वापर झाल्यास त्यांच्यविर- ोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.

घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे स्वयंपाक करताना अडचण निर्माण होते. बुकिंग करतानाही पाच ते सहा दिवसांची वेटिंग आहे. गॅस मिळणे अवघड झाले आहे. लाकडाचा वापर सुरू आहे.
- दिपाली बेराड, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT