Farmers who grow 'gold' in their fields honored by the Agriculture Department
जालना, पुढारी वृत्तगसेवा : आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून आपल्या शेतात सोनं पिकवणाऱ्या जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२५ पीक स्पर्धेतील जिल्हास्तरीय निकाल घोषित करण्यात आले आहे.
पीकस्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक शेती पद्धती, सुधारित तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच विजेत्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या पीक व्यवस्थापन पद्धती, उत्पादन खर्च नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय विजेते शेतकरी वगळून उर्वरित पात्र स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम रामनाथ काळे यांनी 40 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळवून 7 हजार रुपये, तर जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील विशाल रामकिसन जायभाय यांनी 37.37 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळवून 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.
उडीद पीक उडीद पिकामध्ये मंठा तालुक्यातील तळणी येथील अरुण अपाराव सरकटे यांनी 22.50 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळविला असुन, त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. केहाळ वडगाव येथील मधुकर पांडुरंग राठोड यांनी 21.90 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, तर तळणी येथील सौ. मनिषा डिगांबर सरकटे यांनी 20 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
भुईमूग पीकः जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथील कौसाबाई दादाराव अंभोरे यांनी हेक्टरी 26.32 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. टेंभुर्णी येथील रवि साहेबराव खरात यांनी 20.47 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मका पीक मका पिकामध्ये बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील बंडू तुकाराम वैद्य यांनी हेक्टरी 83.25 क्विंटल इतके उल्लेखनीय उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पीकनिहाय जिल्हास्तरीय विजेते
सोयाबीन पीक : दरेगाव (ता. जालना) येथील श्रीमती रुख्मिणी नवनाथ गोडसे यांनी हेक्टरी 40.05 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तूर पीक : बाजार वाहेगाव (ता. बदनापूर) येथील बळीराम रामनाथ काळे यांनी हेक्टरी 30 क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला. मूग पीक : मंठा तालुक्यातील उमरखेडा येथील गोपाल किसनराव जाधव यांनी हेक्टरी 10.25 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळवून 10 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.