आन्वा, पुढारी वृत्तसेवा : शासनाने दिलेला शब्द न पाळल्याने शेतकऱ्यांचा यंदा दिवाळीचा आनंदोत्सव हिरावला. दिवाळी संपली तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळा-लेली नाही. शासनाने दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील सर्व पीक खराब झाले तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरडून निघाल्या. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत होईल व दिवाळीपूर्वी शासकीय मदत खात्यांत जमा झाल्यास शेतकऱ्यांना सुद्धा दिवाळी साजरी करता येईल असे वाटत होते. परंतु, शासनाने दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
भोकरदन तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील मका, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटात आला आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांजवळ बियाणे घ्यायची सुद्धा सोय नाही. शासनाने त्वरित खात्यात पैस जमा करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक खराब झाले. सोयाबीन, मका, कपाशीचे मोठे नुकसान झाले. शासन पंचनाम्याचे आदेश दिले. शेतीचे पंचनामे करण्यात आले परंतु अजूनपर्यंत शासनाच्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. शेतकऱ्यांना मदत करा हो साहेब अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहेत.