Farmers did not get crop loans for kharif sowing
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: सध्या खरिपासाठी बी बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सूरू आहे. काही बँका नियमित कर्ज उचलून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देतात. बऱ्याच वेळा कर्ज वेळेवर मिळत नाही. थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना तर बँक दारातही उभे करीत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जवळची सोने-चांदी गहाण ठेवून वेळप्रसंगी विकून शेती करावी लागत आहे.
मागील काही वर्षापासन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे बऱ्याच वेळा तर शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. शासनाने जाहीर केलेला हभीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामूळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
यातूनच आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेताना शेतकरी दिसून येत आहेत. ऐकीकडे वी बियाणे, खत व मजुरीचे दरवर्षी वाढत आहे. शेतात राबायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सोने-चांदी गहाण ठेवून शेती कसताना दिसून येतो, अवकाळी पावसाचा फटका बसते अशावेळी संपूर्ण पीक नष्ट होते, शेतकरी हवालदिल होतो. असल्याचे शेषराव पाडळे यांनी सांगितले.
शेतमालाला भाव मिळत नसल्यामळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजक झाली आहे. बऱ्याच वेळा लावलेला खर्चेही निघत नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना शेती पडीक पडूनये म्हणून सोने गहाण ठेवण्याची वेळ येते.- रमेश सिरसाठ, शेतकरी वाकडी