Jalna Farmer News : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने तीन एकर मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी File Photo
जालना

Jalna Farmer News : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने तीन एकर मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या झाडांना लागलेली सर्व फुले तर गळून गेली.

पुढारी वृत्तसेवा

Due to heavy rains, the farmer rotated three acres of Mosambi garden, JCB

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पेरजापूर येथील शेतकऱ्याने मोसंबी बाग जेसीबीच्या साह्याने उपटून टाकल्याची घटना घडली. पेरजापूर येथील शेतकरी रंगनाथ लक्ष्मण तळेकर यांच्याकडे एक हेक्टर ३७ आर शेतजमीन आहे. त्यापैकी गट नंबर १६५ मध्ये दीड एकर जमिनीवर त्यांनी २० जानेवारी २०२० मध्ये ३५० मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. या झाडावर त्यांनी आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च केला पाच वर्ष सांभाळलेल्या या झाडांना आता चांगली फळे लागण्याचे दिवस आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या झाडांना लागलेली सर्व फुले तर गळून गेली.

मात्र जास्त पाण्यामुळे या झाडांच्या मुळ्या सडल्याने ही झाडे भविष्याच्या दृष्टीने निकामी होणार असल्याने रंगनाथ तळेकर यांनी या बागेमध्ये सरळ जेसीबी फिरवत वाढविलेली ही ३५० मोसंबीची झाडे जड अंतकरणाने उघडून टाकली. या झाडांवर झालेला अडीच लाख रुपये खर्च व जमिनीतून मिळणारे उत्पन्न वाया गेल्याने रंगनाथ तळेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सरकारने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तळेकर व त्यांच्या सारख्या इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा गावातील इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT