Drinking water center in Agricultural Produce Market Committee in deplorable condition
जालना, पुढारी वृत्तसेवाः मराठवाड्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मूलभूत सुविधांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेले सार्वजनिक पेयजल केंद्र सध्या भन्न अवस्थेत पडून असून, त्याचा कोणालाही उपयोग होत नसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
बाजार समिती परिसरातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, परिसरातील शौचालय कार्यरत असले तरी त्याचे सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये न सोडता थेट मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जात असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन पेयजल केंद्र दुरुस्त करण्याच्या सूचना देवून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह, व्यापाऱ्यांकडू करण्यात येत आहे.