संत मुक्ताई पालखी, रिंगण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा file photo
जालना

संत मुक्ताई पालखी, रिंगण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवार, दि.१ रोजी घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

पुढारी वृत्तसेवा

District Collector reviews preparations for the Sant Muktai Palkhi and Ringan ceremony

जालना, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या तसेच जिल्ह्यात प्रथमच आयोजित होत - असलेल्या रिंगण सोहळ्याच्या - पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवार, दि.१ रोजी घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करून आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, अखंडित वीजपुरवठा, आरोग्य सुविधा औषधीसाठा, तात्पुरती वैद्यकीय पथके, मोबाईल व सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच मुक्कामस्थळी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, आवश्यकतेनुसार वाहतूक

जिल्ह्यात प्रथमच होणार रिंगण सोहळा

जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, व्यासपीठ उभारणी तसेच इतर सर्व आवश्यक नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT