Jalna News : जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंठा चौफुली ते न्हावा रस्त्याची पाहणी file photo
जालना

Jalna News : जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंठा चौफुली ते न्हावा रस्त्याची पाहणी

रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

District Collector inspects the Mantha Chaufuli–Nhava road

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील मंठा चौफुली ते न्हावा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी घटनास्थळी जाऊन या रस्त्याची पाहणी केली.

या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना व वाहनचालकांना खड्यांमुळे तीव्र अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याची स्थिती पाहिली असता, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरळीत वाहतूक लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले. दुरुस्तीचे काम दर्जेदार असावे आणि ते विहित वेळेत पूर्ण व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यांची उपस्थिती

या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दौंड, महानगरपालिकेचे अभियंता, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT