Difference in heavy rainfall subsidy
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाईची रकम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून या अनुदान काही तफावत आढळून येत आहेत. दरम्यान काही शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ सारखेच पण काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त नुकसानभरपाई अनुदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
शासनाने प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये अतिरिक्त अनुदानासही मंजुरी देत आणखी दिलासा दिला आहे. यासाठी ४२१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्याच्या खात्यात रकम जमा केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांना अद्याप मॅसेज न आल्याच्या तक्रारी आहेत. आन्वा भागातील काही शेतकरी यांना दोन एकरसाठी एका शेतकऱ्याला तीन हजार दुसऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार मिळाली आहे. ही तफावत आल्याने शेतकरी संभ्रात आहे. शिवाय शासनाने शेतकरी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाने जाहीर केलेल्याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना असून, रब्बी हंगामासाठी हातभार लागला आहे. रब्बी हंगामात बी-बियाणे खते खरेदीसाठी या अनुदानाच्या रकमेचा शेतकऱ्यांना उपयोग करता येणार आहे.
दिलासा मिळाला
अतिवृष्टी आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत थेट जमा केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.