धनगर समाजबांधवांचे मुंबईत आंदोलन file photo
जालना

धनगर समाजबांधवांचे मुंबईत आंदोलन

आरक्षणाच्या अंमलबजावणीपर्यंत आंदोलन सुरू राहणार : बो-हाडे

पुढारी वृत्तसेवा

Dhangar Community Members Protest in Mumbai

जालना, पुढारी वृत्तसेवाः

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागु करण्यात यावे या मागणीसाठी जालना शहरातुन मोठ्या संख्येने समाजबांधवांनी मल्हार योध्दा दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात मुंबईकडे कुच केली. आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यत लढा सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी बोऱ्हाडे यांनी दिला.

जालना शहरातील अंबड चौफुली येथुन मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार पासुन होणाऱ्या आंदोलनासाठी वाहनातुन रवाना झाले. यावेळी माध्यमांशी बोलतांना दिपक बोऱ्हाडे म्हणाले कि, दिपकने आग पेटवली आहे. त्याचा वणवा भडकवु देउ नका.

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागु करण्याच्या मागणीसाठी मागच्या बारा वर्षापासुन लढा सुरु आहे. बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नाहीं.

कालही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी अजुन काही वेळ देण्याची मागणी केली. यावेळी आम्ही त्यांना बारा वर्ष वेळ दिल्याचे सांगीतले. मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील धनगर समाज बांधव सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

अटकचे नाटक नको

मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवारी सकाळी १० वाजता दिपक बोऱ्हाडे हे धनगर समाजाला आरक्षण लागु करण्याच्या मागणीसाठी उपो-षणाला बसणार आहेत. मागील वेळेप्रमाणे यावेळी अटक करण्याचे नाटक करु नका नसता मुंबईत काय होईल हे सांगता येणार नाही असा इशाराही दिपक बो-हाडे यांनी सरकारला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT