वडीगोद्री : आमची लढाई आरक्षणाचीच आहे आरक्षणाची लढाई आम्ही सोडलेली नाही पण तुम्ही लोकं मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का.? असा सवाल जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना केला आहे. धनंजय मुंडे जातीयवाद करत आहेत, ते टोळ्या पाळतायत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात लढत राहणार असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
धनंजय मुंडे ओबीसींना फोन करून त्यांच्या बाजूने उभे राहायला सांगतायत असा आरोप देखील त्यांनी केला. लोकांच्या पोरांच्या हत्या करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी टोळ्या पाळल्याचे मनोज जरांगे म्हणालेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी तत्परता का दाखवली नाही असा सवालही त्यांनी केला. धनंजय मुंडेंचे गुंड हे संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या देत आहेत. त्यामुळे मी गुंडांना बोललो, कुठल्या जातीला बोललो नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या प्रकरणात मराठा ओबीसी संबंध येतो कुठे असा सवाल देखिल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.