तांगडे कुटुंबाच्या मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली file photo
जालना

तांगडे कुटुंबाच्या मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली

भिलपुरीतील अंबादास तांगडे कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण; शेतकरी कुटुंबाला मिळाला आधार !

पुढारी वृत्तसेवा

Deputy Chief Minister Eknath Shinde has taken responsibility for the Tangde family's daughter—covering everything from her education to her marriage.

जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना दौऱ्यावर असताना शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. या वेळी त्यांनी तांगडे कुटुंबातील मुलीची तिच्या संपूर्ण शिक्षणासह विवाहाची जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणाला किंवा त्यांच्या भवितव्याला मर्यादा येऊ नयेत, या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे तांगडे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलीच्या स्वप्नांना शासनस्तरावरून मिळालेला हा पाठिंबा कौतुकास्पद ठरत आहे.

शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबाला केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर मानसिक आधाराचीही गरज असते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मिलपुरीतील तांगडे कुटुंबाच्या भेटीदरम्यान शिक्षण आणि विवाहाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा ही अशाच सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT