डोणगाव ःजाफराबाद तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वन्य प्राण्यांची पाण्याकरिता जंगलामध्ये दूर दूर पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलात पाणवठे तयार करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पक्षप्रेमी यांच्याकडून होत आहे.
डोणगाव शिवारात नदी, नाल्याने पाणी नसल्याने माकडे गावात पाण्याच्या शोधात येत आहे. पाण्याच्या शोधात गावाल आलेल्या एका माकडाच्या पिल्ल्याच्या गळ्यात तांब्या अडकला होता. वनविभागातर्फे माकडाच्या गळ्यातून तांब्या काढून सुटका केली.
वन विभागाने जाफराबाद तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत जंगलामध्ये कुठेही वन्य प्राण्याकरिता पाण्याची ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे आरोप नागरिक व पक्षी प्रेमी यांच्याकडून करण्यात येत आहे. नदी, नाले, ओढे विहिरींची तळ गाठला गावासह शेतात उन्हाळ्यामुळे वन्य प्राणी पक्षी माकड इतर पाण्याच्या शोधासाठी फिरताना दिसत आहेत.
विहिरींना तळ गाठला पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात उन्हाळ्यामुळे शेतामध्ये जनावराकरिता पाणी उपलब्ध करू शकत नसल्याचे दिसते. जनावरे पक्षी प्राणी वर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, प्रशासनाच्या वतीने उपयोजना कराव्यात.
वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याकरिता वन विभागाने व शासनाने सहा महिने उन्हाळ्याच्या तीव्र टंचाई लक्षात घेऊनच वन्य प्राण्यांची व जनावरांची पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.विजय भालेराव, पक्ष प्रेमी
आत्तापर्यंत जंगलामध्ये कुठेही वन्य प्राण्यांच्या करिता सोय उपलब्धता नसल्याचे लक्षात आले आहे. फक्त शासन वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्यात पाण्याची सोय करत नसल्याचे दिसून येत आहेत. डोणगावात पाण्याच्या शोधात वानर गावात येत आहे. एका पिल्ल्याच्या डोक्यात तांब्या अडकला होता. वनविभागाच्या वतीने तो तांब्याकडून 38 माकाडाना पिंजर्यात पकडले आहे.संदीप घोडके, ग्रामस्थ