Jalna News : अंबड शहरात वाहनांची धोकादायक वाहतूक file photo
जालना

Jalna News : अंबड शहरात वाहनांची धोकादायक वाहतूक

शहरात वाहतूक कोंडी; पार्किंगच्या समस्येने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Dangerous vehicular traffic in Ambad city

अंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड शहरातून लोडिंग ट्रक, ऊस् घेउन जाणारे ट्रॅक्टर, कंटेनर, वाळू व खडीची वाहतूक करणाऱ्या हायवांचा मुक्त संचार सुरु आहे. शहरातील जालना-बीड मार्गावर या जड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांचा धोका वाढला असतांनाच ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतांना दिसत आहे. शहरातुन होणाऱ्या जड वाहतुकीमुळे वळण रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबड शहरातून जाणारा जालना-बीड मार्ग हा मुख्य वाहतुकीचा मार्ग आहे. अंबड-पाचोड मार्गावरही गेल्या काही वर्षांत जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहराला अद्याप बायपास रस्ता नसल्याने बाहेरगावी जाणारी जड वाहतूक आणि शहरातील दैनंदिन रहदारी मुख्य रस्त्यांवरून सुरू असते.

त्यातच या मार्गालगत स्वतंत्र सर्व्हिस रोड नसल्याने वाहतुकीचा ताण आणखी वाढला आहे. शहरात नियोजित पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेतील दुकानदार व ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी केली राहतात. त्यात फळविक्रेते, हातगाडीधारक आणि अन्य व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे.

परिणामी पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे. बसस्थानक परिसरात काळी-पिवळी तसेच अन्य खासगी प्रवासी वाहने रस्त्यावरच थांबत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

सध्या विविध साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक सुरू झाली आहे. ऊसाने भरलेली वाहने शहरातून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीचा धोका वाढला आहे. शहरातील गर्दीच्या भागातून होणारी जड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ठोसउपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT