Jalna Rain News : धरणे कोरडीठाक, शेतकरी चिंतेत ! - जालनेकरांवर जलसंकटाची गडद छाया file photo
जालना

Jalna Rain News : धरणे कोरडीठाक, शेतकरी चिंतेत ! - जालनेकरांवर जलसंकटाची गडद छाया

पावसाळा अर्धा सरला, ७ मध्यम प्रकल्पांत अवघा २६ टक्केच साठा ! जुई ६.५८ तर धामणा धरणात ३.६७ टक्के पाणीसाठा-

पुढारी वृत्तसेवा

Dams Bone-Dry, Farmers Worried! – Looming Water Crisis Casts a Shadow Over Jalna Residents

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यावर यंदा अलनिनोचे संकट घोंगावत आहे. जुलै महिन्याचे केवळ ४ चार दिवस उरले आहे. पावसाळा अर्धा सरला तरी जिल्हाभरातील धरणांना अजून मोठवा पावसाची आस लागली आहे. सध्या परिस्थिलत पाहता जिल्हाभरातील ७ मध्यम प्रकल्पात केवळ २६ टक्केयच जलसाठा उपलबध्द आहे. यामुळे येत्या काळा जोरदार पाऊन झाला नाही, तर जिल्ह्यावर जलसंकट ओढावणार असल्याची परिस्थिकती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पावसाच्या धारा बरसल्या असल्या, तरी जिल्ह्याला जीवनदान देणाऱ्या धरणांच्या पोटात मात्र अजूनही म्हणावे तसे पाणी साठलेले नाही. जलसंपदा विभागाच्या २३ जुलै रोजीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून केवळ २६.२८ टक्के एवढाच तुटपुंजा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एका बाजूला पावसाळा अर्धा अधिक लोटला असताना, धरणांची ही दयनीय अवस्था पाहून बळीराजासह शहरवासियांचीही चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांची एकूण जल साठवण क्षमता ६५.७९ दलघमी एवढी आहे. प्रत्यक्षात मात्र आजघडीला या सर्व धरणांत मिळून फक्त १७.२९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उरला आहे.

कल्याण गिरजा प्रकल्प (ता. जालना): येथे ४.५८ दलघमी (४७.३६ टक्के) साठा नोंदवला गेला. कल्याण मध्यम प्रकल्प (ता. जालना): या प्रकल्पात ५.६५ दलघमी (४६.२३ टक्के) पाणी उपलब्ध आहे. अप्पर दुधना प्रकल्प (ता. बदनापूर) येथे ३.५७ दलघमी म्हणजेच केवळ २९.५४ टक्केच पाणीसाठा उरला आहे. मात्र, जुई (भोकरदन) प्रकल्पात अवघे ६.५८ टक्के, तर धामणा (भोकरदन) प्रकल्पात केवळ ३.६७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

फक्त मध्यमच नव्हे, तर जालना जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक को.प. बंधारे आणि लघु तलावांमधील पाणीपातळी खालावल्याने तळ दिसत आहे. भोकरदन, बदनापूर आणि जाफराबाद परिसरातील अनेक जलसाठे अद्यापही कोरडेठाक किंवा मृत साठ्यात वर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जालनेकरांची चिंता वाढवली आहे.

पिण्याच्या पाण्याचाही बिकट प्रश्न !

जालना तालुक्यात आणि लगतच्या भागात पावसाने पाहिजे तशी दम धरलेली नाही. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा मोठा प्रवाह धरणांकडे अजूनही आलेला नाही. परिणामी, चालू खरीप हंगामातील पिकांना वाचवायचे कसे आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, या विवंचनेने शेतकरी वर्गाची झोप उडवली आहे. आता वरूणराजा कधी कृपा बरसावणार आणि जालना जिल्ह्यातील या तहानलेल्या धरणांचे पोट कथी भरणार? याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT