Jalna News : अंतरवाली सराटी येथे ओबीसींचे प्रति आंदोलन file photo
जालना

Jalna News : अंतरवाली सराटी येथे ओबीसींचे प्रति आंदोलन

ओबीसींचे हक्क व संविधानीक अधिकार टिकविण्यासाठी उपोषण

पुढारी वृत्तसेवा

Counter-protest by OBCs at Antarwali Sarati

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता अंतरवाली सराटीतच ओबीसी समाजाकडून रविवार (६) पासुन प्रति आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. रविवार (६) पासुन ओबीसी आंदोलक अॅड मंगेश ससाण, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतरवाली येथील सोनिया नगर येथे रविवारपासुन उपोषण सुरू केले आहे.

जरांगे यांच्या आंदोलनातून सरकारवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत ओबीसींचे हक्क व सविंधानीक आरक्षण टिकवण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे ससाणे यांनी सांगितले. यावेळी अड, मंगेश ससाणे म्हणाले, उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जात आहे. मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख दाखले देण्यात आले आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे पायघड्या टाकत आहेत. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी संविधानि क मार्गाने आंदोलन करत आहोत. "नोडल अधिकारी नेमण्याच्या निर्णया वरही ससाणे यांनी आक्षेप घेतला. नोडल ऑफिसर नेमणे हे बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

"सरकारवर दबाव टाकला जात आहे. ओबीसींची मंत्रिमंडळ समिती येथे येते का, हे आम्ही पाहणार आहोत," असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ससाणे यांनी टीका केली. "देवेंद्र फडणवीस एका समाजाला स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत.एका आडमुठ्या माणसामुळे महाराष्ट्र वेठीस धरला जात आहे,' असा आरोप त्यांनी केला.

मागेल त्याला कुणबी दाखला देणार, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल्याचा दाखला देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या आणि भूमिका संविधानिक मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपोषणाची उपोषणाची चर्चा होतांना दिसत आहे

सरकारला इशारा

अंतरवाली सराटीत ये-जा करणाऱ्या मंत्र्यांवरही ससाणे यांनी निशाणा साधला. इथून जाणाऱ्या मंत्र्यांना जनाची नाही तर मनाची वाटणार, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला. आंदोलन सुरू होण्याच्या वेळेस... आंदोलकांकडून एकच पर्व ओबीसी सर्व, उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमचे नाही कुणाच्या बापाचे, इत्यादी घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे महापुरुषांच्या नावाने ही आंदोलन स्थळी जयघोष करण्यात आला.

ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी दाखल्या द्वारे होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही हे लाक्षणिक उपोषण सकल ओबीसी समाजातर्फे करत आहोत.
अॅड मंगेश ससाने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT