Cotton crop damaged due to continuous rains
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कपाशीच्या वाती बनल्या आहे.
शेतात आलेल्या शेतकऱ्याची चांदी म्हणून ओळखले जाणारे कपाशीमध्ये वेचण्यासाठी मंजूर मिळत नसल्याकारणाने आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शतावरी कापसाला कोण फुटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे शासनाने तारखा शेतातील कपाशीचे इतर मालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वाई परिसरात कापूस भिजला;
पांगरी : मंठा तालुक्यातील वाई परिसरात रोज सतत पाऊस पडत असल्याने कापूस वेचणी लांबणीवर पडली आहे. कापूस पावसानं भिजल्यामुळे कापूस खराब होत असल्याने कापसाला भावामध्ये फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कापूस भिजल्यामुळे वजन वाढल्यामुळे कापूस वेचणी करताना जास्त पैसे मोजावे लागतात व परत कापूस विक्रीसाठी कमी भावाने विक्री करावा लागत असल्याने दुहेरी आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान अभ्यासक पाच नोव्हेंबरला पाऊस उघड देणार सांगत आहेत.
तोपर्यंत कापसाच्या वाती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन गेली, त्यापाठोपाठ कापूस हाताचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, पावसामुळे रब्बी हंगामातील पिकाची पेरणी लांबली असून सध्या शेतातील कामे पावसामुळे ठप्प झाली आहेत, सध्या शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे.
दोन एकर कपाशी लागवड केली आहे. सध्या कपाशी वेचण्याठी मजूर मिळत नसल्या कारणाने व त्यातच बे मोसमी पडलेल्या पावसामुळे शेतातील आलेल्या कापसाला फुटले असल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या मात्र कापसाला चार हजार ते ४२०० रुपये भाव असल्यास आम्हाला शेतकऱ्याची आर्थिक नुकसान होत आहे. भाव शेतकरी हतबल झाला. भाव मिळेल याकडे लक्ष द्यावे.-संदीप देशमुख, शेतकरी