Jalna Drought News : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन चारा पाण्याची सोय करा file photo
जालना

Jalna Drought News : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन चारा पाण्याची सोय करा

आढावा बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश; रोजगारासाठी उपाययोजना करा

पुढारी वृत्तसेवा

Considering the severity of the drought, make arrangements for fodder and water

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, पीक नुकसान भरपाई, पीकविमा आणि रोजगार हमी योजनांच्या कामांचे नियोजन प्राधान्याने करा, अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

आमदार मंगळवार, दि. ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर (दृरदृश्यप्रणालीद्वारे), नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण आणि, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधु, प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्यांनी पाणी, चारा आणि रोजगार या तिन्ही प्रश्नांवर केवळ तात्पुरते उपाय न करता नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढवावी आणि रोजगाराची मागणी होताच मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडल्या. पाणीटंचाई, उपलब्धता, शेतीचे नुकसान आणि रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांनी आपल्या भागातील अडचणी मांडल्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि रोजगाराची कामे वाढविण्यासह विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली.

जिल्ह्यातील पीक पंचनामे, पीकविमा, धरणांतील पाणीसाठा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, पशुधनासाठी चारा, रोजगार हमीची कामे आदी विषयांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

जलस्रोतांची स्वच्छता

जिल्ह्यातील वापरात नसलेल्या बारव, विहिरी, विंधन विहिरी तसेच अन्य जलस्रोतांची स्वच्छता, गाळ काढणे आणि आवश्यकतेनुसार पुनर्बाधणीची कामे करावीत. जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील टॅग केलेल्या तसेच टॅग नसलेल्या जनावरांची माहिती संकलीत करून त्यानुसार आवश्यक चारा आणि पाण्याचे नियोजन करावे. येत्या काळात जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी नियोजन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT