Jayakwadi Water : जायकवाडीच्या पाण्यावरून शेतकरी अन् सरकारमध्ये संघर्ष पेटणार file photo
जालना

Jayakwadi Water : जायकवाडीच्या पाण्यावरून शेतकरी अन् सरकारमध्ये संघर्ष पेटणार

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Conflict set to erupt between farmers and the government over Jayakwadi water

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या तीव्र टंचाईवरून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात पाण्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत असताना गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांतून पाणी उपसा करण्यास शेतकऱ्यांना बंदी घालण्यात येत आहे. त्यांचे कृषी पंप देखील हटवण्यात येत आहेत. यामुळे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी संताप व्यक्त करत सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जलसंपदा विभागाने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट टाळण्यासाठी ऑक्टोबर २०२७ पर्यंतचे दीर्घकालीन नियोजन करुन शेती सिंचनावर कडक निर्बंध लादले आहेत. अंबड, घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पात्रातील उच्च पातळी बंधाऱ्यांतील शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद करण्यात आले आहेत. तसेच गोदाकाठच्या विहिरी आणि बोअर पाण्यासाठी राखीव करण्यात येत आहेत. जायकवाडी धरणात जवळपास ७८ टक्के पाणी शिल्लक असताना रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात सरकार इच्छुक दिसत नाही.

विखे पाटलांवर निशाणा

घाटगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मराठवाड्याच्या पाण्याविरोधात राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मागील वेळी मराठवाड्याच्या वाट्याचे ८ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते. त्यावेळी विखे पाटलांच्या इशाऱ्यावर विरोध झाला, तरीही सुप्रीम कोर्टाने मराठवाड्याच्या बाजूनेच निकाल दिला होता. आता पुन्हा सत्तेच्या जोरावर तोच प्रकार सुरू असून विखे पाटलांनी मराठवाड्यात जनउद्रेक ओढवून घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT