जालना : सुहास कुलकर्णी
शहरासह जालना जालना जिल्ह्यातील अनेक भागांत पडलेल्या ढगफुटीसदृश पडलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला. जालना शहरातील गांधी नगर भागात भिंत पडून सुमन मधुकर गुडेकर (६५) ही महिला ठार झाली. शहरात अनेक दुकानांसह नागरिकाच्या घरात पाणी शिरल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले. जालना शहरात दहा कोर्टीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच जालना शहरात एवढा पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे.
जालना शहरातील हनुमान घाट परिसरात राहणाऱ्या बारा व्यर्तीच्या घराला पुराच्या पाण्याचा विळखा बसल्याने अग्रिशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केले. जालना शहरातील टांगा स्टॅण्ड परिसरात एक महिला घरात अडकून पडली होती. तिलाही बाहेर काढण्यात आले. जोरदार पावसामुळे बसस्थानक परिसरातून वाहणाऱ्या सिना व कुंडलिका नदीला मोठे पूर आले, सिना नदीच्या पुरात एक ट्रॅक्टर, कार व दुचाकी वाहून गेले.
सिना नदीच्या पुरामुळे बसस्थानक परिसरात असलेल्या फर्निचर दुकानांसह लाकडे विक्री करणाऱ्या दुकानात पाणी शिरून लाकडे व फर्निचर वाहून गेले. पुरात एक पानटपरी बाहून गेली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या शॉपिंग सेंटरमधील अनेक अंडरग्राउंड दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुलचंदन भगवानदास या कापडाच्या शोरुममधील अंडरग्राउंड मजल्यात पाणी शिरल्याने कपड्याचे मोठे नुकसान झाले.
मंमादेवी ते रेल्वेस्टेशन नस्त्यावरील न परिसरात शॉपिंग सेंटरमधे पाणी शिरल्याने एका हॉटेलसह अनेक दुकाने पाण्याता बुडाल्याने करोडो रुपयांचे नुकसाना झाले. शहरात पाणी निचरा होण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले नसल्याने चोवीस तासांत ८१ मि.मी. पाऊस पडूनही शहरातील अनेक भागात पाणी साचून वाताहात झाली. रेल्वेस्टेशन परिसरातील अण्णा भाऊ साठे नगरात पाणी शिरल्याने अनेक कुटंबीयांच्या घरात पाणी शिरले.
Pudhari News Networkजुना जालन्यातील भाग्यनगर हा भाग उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. याच भागात माजी मंत्री आ. अर्जुनराव खोतकर व माजी मंत्री राजेश टोपे यांचे घर आहे. या भागातील नाल्याल्या पूर आल्याने येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात गुडघ्याएवढे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मोती तलावाजवळील रमाबाई आंबेडकर नगरात पाणी शिरल्याने जवळपास दोनशे ते अडीचशे कुटुंबीयांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या व्यायामशाळेसह जलतरण तलाव परिसरात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. शहरातील भाग्यनगरसह कांचननगर, शिवनगर, जुनी म्हाडा कॉलनी, इंदिरा नगर भाग पाण्यामुळे जलमय झाले होते. भाग्यनगर भागातून अमृतेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्यात बुडाला होता, लकडकोट भागातील अनेक दुकानांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.
जालन्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन आ. अर्जुनराव खोतकर यांनी शहरातील अनेक भागांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणध्वनी करून शहरातील परिस्थितीची माहिती दिली. शहरासाठी एकनाथ शिदे यांनी एनडीआरएफची एक तुकडी पाठवली आहे.
कुंडलिका व सीना दोन्ही नदीच्या काठावरील लक्कडकोट, बसस्टॅण्ड, हनुमान घाट भागात सकाळी सहकार्यांसोबत पाहणी केली. गरीब कुटुंबांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मोबाईल द्वारे महापालिका आयुक्त खांडेकर व तहसीलदार छाया पवार या बाबत माहिती देऊन तातडीने पंचनामे कारण्याबाबत विनंती केली. त्यानंतर पंचनामे करण्यात आले.ओमप्रकाश चितळकर, महाराष्ट्र सचिव, राष्ट्रीय समाज पक्ष, जालना.
जालना शहरात व्यापाऱ्यांसह छोट्या व्यावसायीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत देणे गरजेचे आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांत झाला नव्हता एवढा पाऊस पडला आहे. अनेक दुकाने पाण्याखाली गेले आहेत.हस्तीमल बंब, अध्यक्ष व्यापारी महासंघ
जालना शहरातील हनुमान घाट येथे १६ तर सारवाडी येथे १० नागरीक पाण्यात आडकल्याची माहीती मिळाल्यानंतर प्रशासनास सांगुन या २६ लोकांना रेस्क्यु केले. शहरात सकाळी साडेतीन वाजल्यापासुन नागरीकांच्या मदतीसाठी घराबाहेर पडलो होतो. दुपारी साडेपाच वाजेपर्यंत विविध भागात फिरुन पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलुन एनडीआरएफची टीम मागवली. पुर व पाण्यात आडकलेल्या नागरीकांच्या मदतीसाठी शासनाकडुन हॅलीकॉप्टरही बोलावले आहे. जिल्हाधिकारी व महापालीकेच्या आयुक्तांच्या सकाळपासुन संपर्कात राहुन अडचणीत सापडलेल्या नागरीकांच्या मदत करीत आहे.आ. अर्जुनराव खोतकर, जालना