MLA Arjun Khotkar : जालना शहरात सिटी बस धावणार file photo
जालना

MLA Arjun Khotkar : जालना शहरात सिटी बस धावणार

जालना शहरात सोमवारपासून सिटी बस सेवा सुरू असल्याची होणार माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढारी वृत्तसेवा

City buses to run in Jalna city

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरात सोमवारपासून सिटी बस सेवा सुरू असल्याची होणार माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 17 सप्टेंबर रोजी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक श्रीमती सपकाळ व आगारप्रमुख जैवळ यांच्यासोबत बैठक घेऊन जालना शहरात शहर बस वाहतूक सुरू होणे कसे महत्वाचे आहे हे निदर्शनास आणून दिले. बैठकीदरम्यान सोमवारपासून जालना शहरात सिटी बस सेवा सुरू करण्याचे ठरले.

शहरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार शेतकरी, प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक तेजबीरसिंह संधू यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला.

त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांनंतर सोमवारपासून सिटी बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले. सदर सिटीबस बस स्टॅन्ड, भोकरदन नाका, जालना बाजार समिती, कन्हैया नगर, गणपती नेत्रालय, जे एस महाविद्यालय मंठा चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालय, मोतीबाग, विशाल कॉर्नर, एमआयडीसी, नागेवाडी काकडे पेट्रोल पंप जाईल. दुसरी बस बस स्टैंड, विशाल कॉर्नर, मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मंठा चौफुली, रामनगर साखर कारखाना मार्गे धावेल. तिसरी बस बस स्टॅन्ड, मुथा बिल्डिंग, मंमादेवी, गांधी चमन मार्गे रेल्वे स्टेशन धावेल.

नागरिकांतून स्वागत

सिटी बस सुरू झाल्यामुळे शहरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सिटी बस सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचीही उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT