जाफराबाद ः रेडकूच्या मृत्यूचा पंचनामा करताना उपस्थित वन विभागाचे अधिकारी.  pudhari photo
जालना

livestock attack : अज्ञात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात रेडकूचा मृत्यू

सावंगी परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद ः जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून मधुकर भगवान आढावे यांच्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावंगी परिसरातील गोठ्यात हे म्हशीचे पिल्लू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने त्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.

दरम्यान, याच परिसरात सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वन विभागाकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मृत पिल्लाची पाहणी केली. तसेच पंचनामा करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT