सचिन गायकवाड याचा अपघातात मृत्यू झाला.  Pudhari Photo
जालना

जालना: अंकुशनगर येथे बसला दुचाकीची धडक; तरुण ठार, एक जखमी

Jalna Accident News | अंकुशराव टोपे साखर कारखान्याच्या गेटजवळ घटना

पुढारी वृत्तसेवा

शहागड, पुढारी वृत्तसेवा : एसटी बसला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.५) दुपारी दोनच्या सुमारास कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेटजवळ घडली. सचिन गायकवाड (वय २४, रा.शारदाताई नगर (महाकाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कार्तिक सतीश सोनवणे (वय २२) याच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. (Jalna Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे आज दहावीच्या परीक्षेचा पेपर सुटल्यानंतर अंबड आगाराची एसटी बस मुलींना घेऊन अंकुशनगर येथून कोठाळा गोंदी येथे जात होती. यावेळी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेटजवळील वळणावर बस वळण घेताना विना नंबरच्या दुचाकीने बसला (एम.एच‌.20.बी.एल.3475) पाठीमागून जोराची धडक दिली.

यात दुचाकी चालक सचिन गायकवाड यांच्या तोंडाला, डोक्याला गंभीर मार लागला. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेला कार्तिक सोनवणे याच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली. दोघा जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांनी अंकुशनगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. सचिन गंभीर जखमी असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. बसचा पंचनामा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT