पिंपळगाव रेणुकाई : येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णुंची तपासणी करताना डॉ. सतिष बावस्कर आदी. pudhari photo
जालना

Bhokardan viral infection : व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत वाढ

सर्दी-खोकला-तापाची साथ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई सह परिसरामध्ये वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन प्रसार झाला आहे. आठवडाभरापासून शासकीय व खासगी रूग्णालयात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आणि हिवतापाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत.

पिंपलगाव रेणुकाईसह परिसरात वातावरणातील बदलामुळे गारवा आणि दमटपणा वाढल्याने व्हायरस वेगाने पसरत आहेत. अनेक नागरिक घरगुती उपाय करत असले तरी ताप तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असल्याने त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

"सध्या वातावरणातील बदलामुळे व्हायरल तापाची साथ आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि काहींमध्ये जुलाब अशी लक्षणे दिसत आहेत. घाबरून न जाता पुरेशी विश्रांती घेणे, भरपूर द्रवपदार्थ पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे आवश्यक आहे. शक्यतो या काळा नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

ताप तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तात्काळ तपासणी करा असे डॉ. सतिष बावस्कर यांनी म्‍हटले आहे.

अशी घ्या काळजी

  • उकळलेले पाणी प्या, हात साबणाने वारंवार धुवा. गरम आणि हलका आहार घ्या. बाहेरील आणि उघड्यावरील अन्न खाणे टाळा.

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, सर्दी-खोकला असणाऱ्यांपासून अंतर ठेवाअँटिबायोटिक स्वतःहून घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सात-आठ तास झोप घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT