भोकरदन : भोकरदन नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या दोन गटात जोरदार वादीवाद होऊन मोठा राडा झाला आहे परस्परविरोधी फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये जहीर खा सलीम खा कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझी आई काँग्रेसच्या तिकिटावर नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शफीखा पठाण यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मलाच पाठिंबा का देत नाही असे म्हणून आमच्या घरी येऊन घरात घुसून मला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा प्रकारे दिलेल्या तक्रारीवरून नवनिर्वाचित नगरसेवक शफिक खा पठाण यांचे विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे•
तर याच प्रकरणात , नवनिर्वाचित नगरसेवक शफिक खा पठाण यांचे पुतणे अश्फाक माजिद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. की त्यांच्या गल्लीमध्ये घराच्या पाठीमागे जनावरांच्या कत्तलखानीची घाण टाकण्यात येते या घाणीमुळे सर्व रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. यासंबंधी सांगण्यासाठी गेले असता त्याचा राग धरून आरोपी जहीरखा कुरेशी मुजीबखा कुरेशी फजलखा कुरेशी व रशीदखा कुरेशी यांनी घरात घुसून लोटालोटी करून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा प्रकारे दिलेल्या तक्रारीवरून जाहीर खा कुरेशी यांच्यासह चौघांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाने हे करीत आहे
कुरेशी व पठाण गटामध्ये दिनांक 29 रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान जोरदार वाद होऊन मोठा राडाही झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे.