भोकरदन ः शहरात पुरवठा विभागाने मारलेल्या छाप्यात 8 घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले. सिलिंडरसह अधिकारी.  pudhari photo
जालना

Hotel raid gas cylinders seized : भोकरदन शहरात 40 हॉटेलची तपासणी, आठ सिलिंडर जप्त

हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर; पुरवठा विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन ः भोकरदन शहर व परिसरातील हॉटेल आणि खानावळ व्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत भोकरदन शहर व परिसरातील सुमारे 40 हॉटेल व खानावळींची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 8 ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले.

नियमबाह्य वापर आढळल्याने संबंधित 8 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून ते संबंधित गॅस एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, सहायक जिल्हाधिकारी बी. सर्वानन, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर तसेच तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पुरवठा नायब तहसीलदार सदानंद नाईक, पुरवठा निरीक्षक संदीप गाढवे, पंजाब सुरडकर आदींच्या पथकाने सहभाग घेतला.

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे हा नियमबाह्य प्रकार आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित गॅसचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नियमित तपासणी मोहीम राबवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल.
सदानंद नाईक (पुरवठा विभाग नायब तहसीलदार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT