Dhamna dam pudhari photo
जालना

Dhamna dam water level : धामणा धरणामध्ये दोनच टक्‍के पाणीसाठा

पिंपळगाव रेणुकाई : शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण, भविष्यात पाणीटंचाई संकट भेडसावणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील सेलूद सिंचन शाखा (क्र. ११) अंतर्गत येणाऱ्या धामना मध्यम प्रकल्पाची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. २४ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार धरणात केवळ २.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनावर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच भविष्याच तीव्र पाणीटंचाई संकट उभे राहण्याची शक्यत आहे.

गळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी याच दिवशी धरणात ५.८०३ दलघमी उपयुक्त साठा होता, म्हणजेच १०० टक्के धरण भरलेले होते. त्या तुलनेत यंदा धरण अक्षरशः कोरडेठाक पडले आहे. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान न झाल्याने धरणात येवा (आवक) अत्यंत कमी झाली आहे. १ जून पासून एकूण येवा नगण्य असल्याचे अहवालात दिसून येत आहे.

धामणा प्रकल्पावर सेलूद परिसरातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. केवळ दोन टक्के पाणी असल्याने रब्बीच्या गहू, हरभरा पिकांना पाणी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करावे आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वेळेत पाऊस न झाल्यास या भागात टँकरची मागणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धरणाची पाणी पातळी ५७९.२० मीटरवर पोहोचली आहे. धरणाचा एकूण साठा २.३४७ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा फक्त ०.१३७ दलघमी इतकाच आहे. आज रोजी बाष्पीभवन आणि सिंचनासाठी पाणी वापर शून्य असला तरी बिगर सिंचनासाठी ०. २७५ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.
पी.एम. हुडेकर, कालवा निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT