बन्सल यांची बदली; तेगबीर सिंह संधू नवे पोलिस अधीक्षक file photo
जालना

बन्सल यांची बदली; तेगबीर सिंह संधू नवे पोलिस अधीक्षक

जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागात करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bansal Transferred; Teghbir Singh Sandhu new Superintendent of Police

जालना, पुढारी वृत्तसेवा :

जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचीही बदली चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

नवीन पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू हे २०१८ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडेरचे पोलिस अधिकारी आहेत. गेल्या काही वर्षांत जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. खून, दरोडे, लूटमार आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ नागरिकांमध्ये झाल्याचे चित्र समोर आले.

शहरासह ग्रामीण भागात गंभीर गुन्हे सर्रास घडत असल्याने असुरक्षिततेची भावना वाढली होती. नव्या पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्था सुधारण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नवीन पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासमोर जिल्ह्यातील वाढती गुन्-हेगारी नियंत्रणात आणणे, अवैध धंद्यांवर आळा घालणे आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवणे ही मोठी आव्हाने असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT