विधानसभा निवडणुक  file photo
जालना

Assembly Election : विधानसभा निवडणूक, प्रशासन अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवाः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदि मुद्रणांचे संनियंत्रणासाठी नियम व अटी पाळणे गरजेचे असल्याची माहती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसल्यास असे पत्रक व भितीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणा-या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने ते मुद्रण करू नये.

दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणुक अधिकारी तसेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.

निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रीतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा होतो. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे उल्लंघन करील त्या व्यक्तीवर कारवाई होठ शकते.

उमेदवारांनी नोंद घ्यावी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी सुचीत केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT