आष्टी : अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. pudhari photo
जालना

Jalna crime : आष्टी परिसरात अवैध वृक्षतोडीवर कारवाई

लाकडाची विनापरवाना वाहतूक; आयशर ट्रकसह लाकूडसाठा जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात अवैधरीत्या वृक्षतोड करून लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिस विभाग व वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. पाथरी–घनसावंगी मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत आयशर (एमएच २६ बीई ३२३६) तसेच त्यामधील मोठ्या प्रमाणातील लाकूडसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी परिसरात पथकाने लक्ष ठेवले होते. पाथरी- घनसावंगी रोडवर संशयास्पदरीत्या लाकूड वाहतूक करणारा आयशर ट्रक आढळून आल्यानंतर पथकाने त्यास थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कडुलिंब, बोर, करंजी आणि बाभूळ आदी झाडांचे लाकूड आढळून आले.

सदर वृक्षतोड व लाकूड वाहतुकीस आवश्यक परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने ट्रक व लाकूडसाठा ताब्यात घेतला. ही कारवाई वनपाल एस. एन. पठाण व वनरक्षक एम. डब्ल्यू. सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.तसेच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. जी. पवार, राणा पांढरे, विनोद वाघमारे, ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

वन विभागाच्या पथकात वनरक्षक परतूर एम. एम. डब्ल्यू. सय्यद यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सदर प्रकरणी संबंधितांविरुद्ध वनअधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वन विभागाकडून तपासणी, कारवाई

अवैधरीत्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक होत असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाकडून तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईनंतर संबंधित लाकूडसाठा नेमका कोठून आणण्यात आला, वृक्षतोड कोठे करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT