भोकरदन : येथे आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल. pudhari photo
जालना

Ashish Jaiswal : शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकट करावे

भोकरदन येथील कार्यक्रमात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन :पक्षातील गावापासून ते शहरातील कार्यकर्त्यानी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्य करावे. पक्ष तुमच्या कार्याची निश्चित दखल घेईल. यापुढे कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. असे प्रतिपादन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे भोकरदन तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता. त्यांच्या उपस्थित मतदान यादी पुनर्लोकन एस.आय.आर बाबतची आढावा बैठक तसेच पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांचा मेळावा भोकरदन येथे रत्नमाला लॉन्स येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके, उपजिल्हाप्रमुख भूषण शर्मा उपस्थित होते.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार नाही त्या ठिकाणच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. त्याचा एक भाग म्हणून पक्ष वाढीसाठी आज आपण या ठिकाणी पक्ष बांधणे आणि मतदान यादी पुनर्लोकन काम आढावा घेण्यासाठी भोकरदन येथे आलो आहे.

या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी पक्षाकडून मदत होत नसल्याची तक्रार यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही पक्ष संघटना बळकट करण्याचे काम करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पक्ष तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील तुमच्यावर यापुढे कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी प्रस्ताविक नानासाहेब वानखेडे यांनी केले. तर विधानसभेत मतदार संघाचा संपूर्ण माहिती पक्षाचा व एस आय आर चा आढावा भूषण शर्मा यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख विशाल गाडे, जाफराबादचे तालुकाप्रमुख दत्ता बंगाळे, युवा सेना तालुका प्रमुख गणेश पुंगळे, बालाजी पवार, श्रमिक सेनेचे राजेंद्र परिहार, शिवाजी इंगळे उपस्थितीत होते.

न्याय देण्यात येईल

पक्षाच्या कामात कुचराई करता कामा नये जो काम करेल त्याला यापुढे न्याय देण्याचं काम पक्षाच्या वतीने करण्यात येईल. जो काम करणार नाही, अशा कार्यकर्त्याची पक्षाही गरज नसल्याचे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT