पट्टा पद्धतीने हरभरा लागवडीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल File Photo
जालना

Jalna News : पट्टा पद्धतीने हरभरा लागवडीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल

भोकरदन : यंदा रब्बीत ६५ हजार हेक्टरवर होणार पेरणी

पुढारी वृत्तसेवा

Anwa Farmers in the taluka gram cultivation

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामात हरभरा लागवडीकडे कल वाढला असून, अनेक शेतकरी आता पारंपरिक पेरणीऐवजी पट्टा पद्धतीने लागवड करत आहेत. या पद्धतीमुळे कमी जागेत अधिक उत्पादन मिळते. तसेच, आंतरपीक म्हणून रब्बी हंगामात हरभरा यांची लागवड करणे फायदेशीर ठरत आहेत.

भोकरदन तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना परतीच्या व अवकाळी पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करू टाकले आहे. विहिरीच्या पाणी पातळीत देखील लक्षणीय वाढ झाली असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. दरम्यान पट्टा पद्धतीमुळे पिकांची आंतरमशागत करणे आणि काढणी करणे सोपे होते.

दरम्यान परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने परिसरातील नदी-नाले, तलाव धरणे, विहिरी ओसंडून वाहत आहेत. सप्टेंबरच्या सुरवातीला झालेल्या जोरदार पावसान देखील जोरदार हजेरी लावल्याने पाणी पातळीत आणखी वाढ झाला आहे. या पावसाचा फटका ऐन सोंगणीसाठी आलेल्या खरिप पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

अशा परिस्थितीत जमेल त्या पध्दतीने शेतकरी शेतातील कामे उरकून घेत आहेत. संततधार झालेल्या पावसात कपाशी, मका, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून लागवड केलेला खर्च देखील निघणे महाग झाले. परंतू खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढले अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामूळे शेतकऱ्यांनी गह, हरभरा, मकासह झतर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. याशिवाय शहरालगतच्या गावातील शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळाले आहे. त्यांना भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात

दरवर्षी खरीपात हात घुऊन बसत असलेला शेतकरी मागील तीन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान होत असल्यामुळे रब्बीचे हमखास उत्पन्न घेऊ लागला आहे. यंदा जवळजवळ ६५ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी करणार असल्याचे तालुका कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर गहू, हरभरा, मका पिकांची लागवड करण्यात आली असून रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT