शहागड ः जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जप्त केलेले घरगुती सिलिंडर .  pudhari photo
जालना

Shahagad gas cylinder raid : अवैध गॅस सिलिंडरप्रकरणी कारवाई

शहागड परिसरात सहा घरगुती सिलिंडर जप्त

पुढारी वृत्तसेवा

शहागड ः अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी अवैध वापर करणाऱ्यांविरुद्ध पुरवठा विभागाने सलग तिसऱ्या दिवशी आपली धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध गॅस विक्रेते आणि वापरकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहागड परिसरात घरगुती गॅसचा बेकायदेशीररीत्या व्यावसायिक वापर होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष शोधमोहीम राबवण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आज पुन्हा 6 अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले.

प्रशासकीय पथक येणार असल्याची कुणकुण अनेक व्यावसायिकांना आधीच लागली होती. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी सिलिंडर लपवून ठेवले होते. यामुळे आजच्या कारवाईत सिलिंडर जप्त होण्याचे प्रमाण काहीसे कमी राहिले, तरीही प्रशासनाने आपला हिसका दाखवून दिला आहे.

ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर आणि अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळी अंबड पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी आपल्या पथकासह ही धडक मोहीम फत्ते केली.

रोज तपासणी

राजस्थानी चौधरी धाब्यावर घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले. विशेष यातील सर्व राजस्थान येथील राहणारे असून त्यांनी महाराष्ट्रातील वडीगोद्री मंडळातील कोणाच्या नावावर सिलिंडर घेत वापर केला. याचा तपास पुरवठा विभाग करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT