अंबड : सातव्या माळीनिमित्त मत्स्योदर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी.  pudhari photo
जालना

Matsyodari Devi Navratri Festival : सातव्या माळेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

अंबडच्या मत्स्योदरी देवी यात्रेचा मुख्य दिवस

पुढारी वृत्तसेवा

अंबड : अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील यात्रेचा मुख्य दिवस असलेली सातवी माळ शनिवारी (दि. १७) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिराच्या पायऱ्यांपासून दर्शनासाठी रांगा लागल्या असून, दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.

सातव्या माळेनिमित्त माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते श्री मत्स्योदरी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई टोपे तसेच समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दिशाताई टोपे यांनीही देवीचे पूजन केले. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

मत्स्योदरी देवीच्या मंदिरात नवस फेडण्याच्या विविध परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जातात. सातव्या माळेनिमित्त लहान बालकांना उंचावरून झोळीत टाकून नवस फेडण्याच्या परंपरेत अनेक भाविक सहभागी झाले होते. दिवसभरात सुमारे साडेआठशे बालकांचे नवस फेडण्यात आले. एक हजार भाविकांनी मंदिराच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडून देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT