अंबड : येथील ओमशांती महाविद्यालयाजवळ असलेल्या शमीम कॉलनीत राहणार्या सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 11 लाख 13 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
अंबड येथील शमीम कॉलनी, ओम शांती कॉलेज जवळील सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या घराच्या खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 25 जून रोजी रात्री घरात प्रवेश करून दीड लाख रुपये किमतीचा तीन तोळ्यांचा सोन्याचा राणी हार, देान लाख रुपयांचे सोन्याचे 4 तोळ्याचे हातातील 2 गोठ, पंचाहत्तर हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे गळ्यातील मंगळसूत्र, एक लाख रुपयांच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 75 हजाराचे दीड तोळ्याचे सोन्याचे कानातील झुंबर, पंचाहत्तर हजारांचा गळ्यातील सोन्याची चैन व पत्ता दीड, पंधरा हजार रुपये किमतीचे 20 तोळ्याचे चांदीचे पायातील 2 चेन, तीन हजारांच्या एक तोळा चांदीच्या 3 अंगठ्या असे 6 लाख 93 हजार रुपये व पाचशे रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने व 4 लाख 20 हजार रुपये रोख असा 11 लाख 13,000 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरीक्षक संतोष घोडके, सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले, स्थानिक गुन्हे शाखेची टीमसह डॉग स्कॉड /फॉरेन्सिक व्हॅन पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक अमोल गुरले हे करीत आहेत.