Crime News  Pudhari
जालना

Ambad crime : शेतीच्या वादातून घरात घुसून मारहाण

दागिने लंपास; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना ः शेतीच्या जुन्या वादातून अंबड तालुक्यातील राजपूत वस्ती परिसरात घरात घुसून महिलेवर मारहाण करत तिचे दागिने हिसकावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मथुरा रतनसिंग राजपूत (30, रा. राजपूत वस्ती, ता. घनसावंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 31 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रल्हादसिंग आनंदसिंग राजपूत, विक्रम प्रल्हादसिंग राजपूत, रवी प्रल्हादसिंग राजपूत (सर्व रा. राजपूत वस्ती) व त्यांचा गडी रवींद्र बाबासाहेब म्हस्के (रा. बनगाव) यांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.

यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे पोत हिसकावून नेल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान महिलेसह तिच्या मुलांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

घटनेनंतर पीडित कुटुंब भीतीच्या छायेत असून पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT