Jalna Crime pudhari photo
जालना

Jalna Crime : अंबड-संभाजीनगर रस्त्यावर गोवंशाची तस्करी उघड

भोकरवाडी टोलनाक्यावरील प्रकार, २२ जिवंत बैल, पिकअपभर हाडामांसाचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

अंबड : धुळे-सोलापूर महामार्गावरील अंबड तालुक्यातील भोकरवाडी टोलनाक्याजवळ गोरक्षकांनी पकडून दिलेल्या कंटेनरमधून दाटीवाटीने कोंबलेले २२ बैल, तर बोलेरो पिकअपमधून जनावरांच्या हाडामांसाचा साठा जप्त करण्यात आला. अंबड पोलिसांनी कंटेनर व बोलेरो पिकअपसह एकूण २२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी रात्री गोवंशीय जनावरांनी भरलेला कंटेनर आणि जनावरांच्या हाडामांसाची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गोरक्षकांनी पकडून ठेवल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक रात्री सुमारे ११ वाजता घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर (एमएच २० ईजी ५३४७) आणि पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच २५ एजे ६४९५) पोलिसांना आढळून आला.

कंटेनर चालक ज्ञानेश्वर संतोष सुरडकर (४०, रा. मातणी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) व त्याच्यासोबत जाकेरखान युनुसखान पठाण (२०, रा. सिल्लोड) यांची चौकशी केली असता, कंटेनरच्या बंद बॉडीमध्ये २२ गोवंशीय नर जातीचे बैल आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबलेले आढळले.

पोलिसांनी २२ बैल ताब्यात घेऊन पारसनाथ गोशाळा, पारुंडी (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे देखभालीसाठी जमा केले. बोलेरो पिकअप चालक प्रमोद मोहन जाधवर (२२, रा. बेंबळीसांजा, ता. जि. धाराशिव) व वाहनमालक इस्तियाक मुक्तियार राईन (४५, रा. खिरणी मोहल्ला, नागनाथ रोड, धाराशिव) या वाहनात जनावरांची बेकायदा कत्तल करून हाडामांसाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत १६ लाख ८० हजार रुपये किमतीचा कंटेनर आणि प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे २२ बैल, असे एकूण ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. संशयित आरोपीविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ बैल पारसनाथ गोशाळेत दाखल

पोलिसांनी २२ बैल ताब्यात घेऊन पारसनाथ गोशाळा, पारुंडी (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे देखभालीसाठी जमा केले. हाडामांसाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही अंबड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १६ लाख ८० हजार रुपये किमतीचा कंटेनर आणि प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे २२ बैल, असे एकूण ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT