Jalna News : अजित पवारांनी केली बाधित जमिनीची पाहणी, आर्थिक मदत तातडीने देणार असल्याचे आश्वासन  (File photo)
जालना

Jalna News : अजित पवारांनी केली बाधित जमिनीची पाहणी, आर्थिक मदत तातडीने देणार असल्याचे आश्वासन

बीडकडून छत्रपती संभाजी नगरकडे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवंड तालुक्यातील शहागड येथे अतिवृष्टी बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

Ajit Pawar inspected the affected land

शहागड, पुढारी वृत्तसेवा : बीडकडून छत्रपती संभाजी नगरकडे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवंड तालुक्यातील शहागड येथे अतिवृष्टी बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शहागड येथील संत एकनाथ चौक पैठण फाटा येथे त्यांनी प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगत शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत देणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी अजित पवार यांना यावेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी अजित पवार यांना निवेदन देउन नुकसान भरपाई देतांना मापदंडाचे निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच फळबागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी केली. गोदावरी काठावरील पूर रेषेच्या आतील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.

जिल्हा सरचिटणीस रवींद्र तौर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, युवा नेते विनायक चोथे, तालुका अध्यक्ष सतीश ढवळे, विठ्ठलराव फरताडे, श्रीमंत खटके, दादासाहेब कदम, अर्जुन शेंडगे, बादशाह पठाण, बाबासाहेब कोल्हे, इलियास कुरेशी, चंद्रकांत लांडे, इरफान सय्यद, प्रकाश खराद, उद्धव खराद, भगवान मोहिते, लक्ष्मण काकडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT