Jalna Market Committee : जालना बाजार समितीत शेतमालाची उलाढाल तेजीत file photo
जालना

Jalna Market Committee : जालना बाजार समितीत शेतमालाची उलाढाल तेजीत

२ कोटी ८७ लाखांचा व्यवहार !

पुढारी वृत्तसेवा

Agricultural product turnover is booming in Jalna Market Committee

जालना पुढारी वृत्तसेवाः कृषी उत्पन्न बाजार समिती, येथे शेतमालाची आवक आणि उलाढाल जोमात सुरू असल्याचे दिसून आले आहे. या एका दिवसात बाजार समितीत एकूण २ कोटी ८७ लाख ९४ हजार ९२२ रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल नोंदवली गेली आहे. या दिवशी बाजारात सर्व प्रकारच्या शेतमालाची मिळून एकूण ५,२११ क्विंटल आवक झाली.

यामध्ये सोयाबीनने बाजी मारली असून, पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक २,९०९ क्विंटल आवक झाली व त्याला कमाल ७,३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. बाजारामध्ये तीळाने सर्वाधिक कमाल भाव गाठत थेट १३,००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला.

त्याोसोबतच मुगाला कमाल ९,३१८ रुपये, उडीदाला ९,२२० रुपये, तर हरभरा आणि ज्वारीला (शाळू) कमाल ७,२०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मक्याची आवकही ८५६ क्विंटलपर्यंत नोंदवली गेली, ज्याला कमाल ३,१५१ रुपयांचा भाव मिळाला. फळभाज्या व गुळाच्या बाजारातही व्यवहार सुरळीत असून पिवळ्या गुळाला कमाल ५,५३३ रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरकडे आणि सचिव भरत तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व दैनंदिन व्यवहार पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT