Accused arrested with narcotic 'button' pills; contraband seized
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना दहशतवाद विरोधी पथकाने अमली पदार्थ व प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत नशेच्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १ हजार ८० बटन गोळ्या हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत एका इसमास पोलिसांनी पकडल्या नंतर त्यादने सदर बटन गोळ्या शहरातील काद्राबाद भागातील एका औषधी दुकानातुन आणल्याचे सांगीतले. त्या वरुन पोलिसांनी केलेल्या कारवाईत औषधी दुकानातुन विविध प्रकारच्या प्रतिबंधित औषधांच्या (बटन गोळ्या) मोठ्या प्रमाणातील गोळ्या, तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत २२ हजार ३३३ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दुखीः नगर भागात राहणाऱ्या शेख अफसर शेख अन्वर तसेच विशाल शंकरआप्पा मिटकरी या दोन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच एनडीपीएस कायदा आणि औषधे व प्रसाधने अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. जालना पोलिसांनी अमली पदार्थ व प्रतिबंधित औषधांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
यांनी केली कामगिरी
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक तेघबीरसिंह संधु, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन इंगेवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारोती शिवरकर, जमादार विनोद गडधे, कैलास कुरेवाड, महेंद्र सोनवणे, दिपक बहुरे, जीवन जाधव यांनी केली.